शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती अंतर्गत ग्रामीण गटातून कॉमर्स विभागाचा प्रथम क्रमांक
सन 2022-23 या शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यापीठामार्फत दिल्या जाणाऱ्या शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्तीमध्ये आपल्या महाविद्यालयाचा वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखाअंतर्गत ग्रामीण या गटातून प्रथम क्रमांक आला आहे. त्याबद्दल मा. कुलगुरू प्रो. डॉ. डी. टी. शिर्केसर यांच्याकडून आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. ए. एम. शेखसर यांचा सत्कार करण्यात आला. सोबत प्र. कुलगुरू, कुलसचिव, वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभाग अधिष्ठाता उपस्थित होते.